About Yogayog Marriage Bureau

योगायोग मॅरेज ब्युरो तर्फे हार्दिक स्वागत....

  • "नोंदणी तुमची सेवा आमची योगायोग मध्ये पडेल गाठ लग्नाची" या आमच्या ब्रीदाला धरून इ .स. २००४ पासून योगायोगची यशस्वी वाटचाल सुरु आहे. २००४ मध्ये नागपूर येथे उच्चशीक्षीत ब्राह्मण उमेदवारांचे स्नेह संमेलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. ह्या अविस्मरणीय संमेलनाद्वारा असंख्य विश्वासार्ह स्थळं योगायोगशी जोडल्या गेलेत. लग्न जुळवण्यासाठी जास्तीत जास्त कशा सेवा देऊ शकतो यासाठी विविध मान्यवरांच्या आणि जाणकारांच्या भेटी घेऊन दरवर्षी योगायोगच्या कार्य पद्धतीमध्ये सदस्यांच्या दृष्टीने सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजच्या या अति प्रगत तांत्रिक युगात अजूनही अरेंज्ड मॅरेज कडे आश्वस्थ नजरेने बघितले जाते. कारण समाजातील वैवाहीक बंधनातील जोडप्यांमुळेच आपल्या राष्ट्राची कुटुंब व्यवस्था टिकून आहे. त्यामुळे फक्त लग्न जमवून चालणार नाही तर ते टिकेल कसे ? ---- यावर योगायोगचा कटाक्ष आहे.
  • महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि इतर मराठमोळ्या विवाहेच्छू उमेदवारांसाठी योगायोग हे एक विश्वासाचं स्थान आहे. इथे या आणि लग्नासंबंधी आपल्या अपेक्षा अटी अगदी मोकळेपणाने सांगा. मुला - मुलींच्या अडचणी असल्यास त्याही आम्हाला निःसंकोच सांगा, निश्चितच आपल्याला मार्ग मिळेल. लग्न जमवण्यासाठी योगायोग तर्फे आपणास संपूर्ण सहकार्य सदैव मिळेल. स्थळं शोधतांना प्रत्येक पायरीवर योगायोग आपल्या सदैव सोबत असेल. सध्या योगायोगमध्ये पुणे, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, नागपूर, विविध देशात आणि विविध शहरात कार्यरत असलेले उच्चशिक्षित स्थळं उपलब्ध असून प्रत्येक स्थळाकडे वैयक्तिक लक्ष दिल्या जाते. प्रथम विवाहेच्छुसह, पुनर्विवाहेच्छू आणि दिव्यांग स्थळांसाठी कसोशीने प्रयत्न केले जातात. गरज असल्यास पर्सनल कॉन्सेलिंगची सेवाही मिळवता येते.
  • नोंदणी तुमची सेवा आमची या शिर्षकाला अनुसरुनच योगायोग सर्व शाखेची ब्राम्हण, मराठा, कुणबी, तेली, क्षत्रीय, राजपूत व इतर अन्य समाजातील सदस्यांना आत्मियतेने सेवा पुरवित आहेत. पुनर्विवाहेच्छुकांचे शेकडो लग्न योगायोगच्याच मध्यस्थीमुळे सहज जुळुन येतात. दरवर्षी योगायोग व्दारे उच्चशिक्षित उमेदवारांचे अनोखे गेट-टू-गेदर आयोजित केले जाते. या कार्यक्रमासाठी खास बाहेरगावचे उमेदवार स्वतः आवर्जून उपस्थित असतात. आणि आधुनिक स्वयंवर पद्धतीने जोडीदार निवडतात. मागील पाच वर्षापासून योगायोग व्दारे प्रकाषित होणारे उच्चशिक्षित स्थळांचा व विवाहविषयक उपयक्त लेखांसहितचे विशेषांक सुद्धा सदस्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
  • "योगायोगव्दारे जुळलेले लग्न यशस्वी होणारच असा विश्वास योगायोगने संपादन केलेला आहे." महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मराठमोळे सदस्य योगायोगच्या सेवेला धन्यवाद व भरभरुन शुभाशिर्वाद द्यायला विसरत नाही. शिव-शक्तीचा संयोग आणण्याचे दिव्यव्रत योगायोग सदैव साकारत राहणार.
    • विवाह म्हणजे दोन कुटुंबाचं अतूट बंधन आहे.
    • सुखी संसाराचं एक सुंदर स्वप्न.
    • खर तर प्रत्येकाची जीवन गाठ ईश्वरच
    • बांधतो परंतू निमित्य मात्र आम्हाला करतो.
    • "योगायोग" द्वारा लग्न जमवणे हा जरी
    • आमचा व्यवसाय असला तरी
    • वैवाहीक सुखी जीवन ईश्वरच सर्वांना देऊ शकतो.
    • तेव्हा प्रत्येक दांम्प्त्यावर सुख,
    • वैभव आणि समृद्धिचा वर्षाव व्हावा
    • एवढीच आमची नम्र प्रार्थना !

      योगायोगच्या उल्लेखनीय सेवा .....

    • अँप, वेबसाईट, फाईल्ससह वैयक्तिक सेवा.
    • महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सुशिक्षित ब्राह्मणांचे भरपूर स्थळं
    • पुनर्विवाहाचे खात्रीचे उच्चशिक्षित स्थळं
    • आंतरजातीय विवाहास इच्छुक विविध समाजांचे फक्त सुशिक्षीत स्थळं
    • महाराष्ट्रातील नामवंत, राजकीय, उद्योग, कला क्षेत्र,व्यावसायिक व समाजसेवा करणाऱ्या स्थळाच्या नोंदण्या योगायोग मध्येच !
    • प्रीमॅरेज कॉन्सेलिंगसह गाठभेटीची सुविधा
  • योगायोगची कार्यकारिणी
    संचालिका :- सौ. गौरी पंकज बेलन
  • लहानपणापासूनच सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या सौ. गौरी बेलन ह्यांनी वैवाहीक क्षेत्रातील उणे अधिक बाबी लक्षात घेऊन सध्याच्या पिढीला कसा जोडीदार योग्य राहील याचा संपूर्ण अभ्यास करूनच योगायोगचे बीज पेरले आहे. विज्ञान स्नातकानंतर फायनान्स म्यानेजमेंट मध्ये व्दिपदवी प्राप्त करून व्यवसायाला पूरक अशा ज्योतिषशास्त्रात त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात वक्तृत्व, वादविवाद, निबंध आणि अभिनय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. नागपूर आकाशवाणीला त्यांनी जवळजवळ १४ वर्ष उद्घोषिका म्हणून काम सांभाळले आहे. नेमक्या शब्दात समोरच्या व्यक्तीस समजावून सांगण्यासाठी विविध विषयाचे त्या सदोदित वाचन करत असतात. महाराष्ट्रातील विविध शहरातील उत्तम समुपदेशकांचं लेखन साहित्य योगयोगच्या वार्षिकांकात त्या आवर्जून प्रकाशित करतात. विदर्भातील नामवंत डॉक्टर आणि ज्योतिषी यांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी विविध संमेलन सुद्धा आयोजित करण्यावर त्यांचा भर आहे. विविध दै. वृत्तपत्राद्वारा आणि आकाशवाणी माध्यमातनं त्याचं विवाह विषयक समुपदेशन पालकांना आणि विवाहेच्छुना प्रेरणा देत असतं. संचालक या नात्याने प्रत्येक मराठमोळ्या युवक युवतीचा लग्नाचा मार्ग सुकर होण्यासाठी त्या स्वतःहून कटीबद्ध आहे.
  • नोंदणी प्रमुख :- योगायोगच्या सदस्यांना अनुरूप स्थळं सुचविण्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सौ. गौरी बेलन ह्यांची मैत्रीण सौ. रुपाली अभय सावजी ह्या योगायोगचा एक मजबुत आधार आहेत. प्रत्येक सदस्याला उमेदवाराचा बायोडाटा न बघताही शिक्षण, पत्रिका लक्षात ठेवून त्या नेहमीच सुयोग्य असे स्थळ सुचवतात. विविध शहरातील प्रत्येक सदस्य स्वतः आणि पालकवर्ग त्यांच्या प्रत्यक्ष वा फोनद्वारे संपर्कात राहून योगायोगच्या सेवेचा लाभ घेतात.

  • विशेष सहयोग -
    योगायोगच्या व्यस्थापनाची संपूर्ण जबाबदारी श्री. पंकज बेलन यांचे कडे असून विविध लोकप्रिय झालेले उपक्रम त्यांच्याच संकल्पनेने संपन्न झालेले आहेत. श्री. बेलन यांनी विविध शहरात जाऊन योगायोगच्या सेवेचा प्रसार उत्तमरित्या केला आहे. दरवर्षी होणाऱ्या वार्षिक गेट-टू-गेदर साठी ते अविश्रांत परिश्रम करून एकेक सदस्याकडे लक्ष पुरवतात. योगायोगच्या वार्षिकांकाच्या प्रूफ चेकींगसारखं बारीक काम ते आवडीने सांभाळतात. योगायोगच्या प्रगतीसाठी ते सदैव तत्पर असतात.
  • Gouri Belan

    Rupali Saoji

    Pankaj Belan

    Meet Our Associates

    106.jpg
    Presenting Londe Jewellers

    105.jpg
    Yogayog Marriage Bureau


    Download app & join now!

    Download and sign up to receive all the latest real estate news.

    Yogayog Marriage Bureau Android App

    Latest Blog